बंगळुरू, 08 मे : सध्या कर्नाटक निवडणुकींचा प्रचार जोरदार सुरू आहे. बंगळुरूमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदावर आपली दावेदारी सांगितली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनण्याचे प्रथमच स्पष्ट संकेत दिलेत. 2019 मध्ये जिंकलो तर पंतप्रधान बनू शकतो, असं वक्तव्य राहुल गांधींनी कर्नाटकच्या प्रचारादरम्यान केलंय.
यापूर्वी बर्कली युनिव्हर्सिटीत दिलेल्या जाहीर मुलाखतीदरम्यानही त्यांनी पंतप्रधानपदासंदर्भात विधान केलं होतं. त्यानंतर आज प्रथमत भारतातही राहुल गांधींनी यासंबंधीचं विधान केलंय. गेल्या चार वर्षात भाजप सरकारने नेमकं काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
कर्नाटकात येत्या शनिवारी 224 जागांसाठी मतदान होतंय. 15 मे रोजी निकाल आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ सरळ मुकाबला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours