08 मे : माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. मात्र आज कोकणवासीयांची ही सावली आपली साथ सोडणार आहे. आपली स्वत:ची सावली अदृश्य झाल्याचा अनुभव आज दुपारी घेता येणार आहे. सिंधुदुर्ग, कणकवली, देवगड, राजापूर आणि मीरज सांगलीत आज दुपारी सावली साथ सोडणार आहे.
दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभवता घेता येणार आहे.
इथे तुमची सावली गायब होईल !
8 मे  - सिंधुदुर्ग, सांगली
11 मे - रत्नागिरी
12 मे - सातारा, सोलापूर
13 मे - उस्मानाबाद
14 मे - रायगड, पुणे, लातूर
15 मे - अंबेजोगाई
16 मे - मुंबई, नगर, परभणी, नांदेड
17 मे - ठाणे, डोंबिवली, कल्याण
19 मे - औरंगाबाद, बीड, जालना, चंद्रपूर
20 मे - नाशिक, वाशीम गडचिरोली
21 मे - बुलडाणा, यवतमाळ,
22 मे - वर्धा
23 मे - धुळे
24 मे - भुसावळ, जळगाव
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours