मुंबई,ता.21 मे : विधान परिषदेच्या 6 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज निवडणुक होत आहे. त्यामध्ये लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदार संघात पंकजा आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.

उस्मानाबाद बीड येथील काकू-नाना आघाडीच्या 9 नगरसेवकांसह इतर दोन अपात्र नगरसेवकांचं मत ग्राह्य धरू नये, असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयानं दिल्यानं राष्ट्रवादीचं मोठं नुकसान होऊ शकतं. सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगडमध्ये नारायण राणे यांनी सुनिल तटकरे यांना पाठिंबा दिल्यानं अनिकेत तटकरेंचं सेनेला आव्हान निर्माण झालंय.

नाशिक, अमरावती-परभणी-हिंगोली आणि वर्धा-चंद्रपूर अशा एकूण 6 जागांवर आज मतदान होणार आहे. नाशिकमध्ये भाजपच्या मतांमध्ये फुट पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मतदारसंघ आणि उमेदवार

1) लातूर-बीड-उस्मानाबाद

उमेदवार

- सुरेश धस(भाजप)

- अशोक जगदाळे( राष्ट्रवादी पुरस्कृत )

2) सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगड

- अनिल तटकरे (राष्ट्रवादी)

- राजीव साबळे (शिवसेना)

3)नाशिक

- नरेंद्र दराडे -शिवसेना

- अॅड .शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

- परवेझ कोकणी (अपक्ष)

4)अमरावती

- प्रविण पोटे-पाटील(भाजप)

- अनिल माधोगडिया (काँग्रेस)

5)परभणी-हिंगोली

- सुरेश देशमुख (कांग्रेस)

- विप्लव बाजोरिया (शिवसेना)

6)वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

- इंद्रकुमार सराफ (कांग्रेस)

- रामदास आंबटकर (भाजप )



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours