मुंबई,ता.21 मे : पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलनं गेल्या 7 वर्षातला उच्चांक गाठलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांत झालेल्या वाढीचा भार देशातील इंधनवर पडलाय.
पेट्रोलच्या किंमतीत ३३ पैशांनी तर डिझेलच्या दरात २६ पैशांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८४.०७ रुपये प्रति लिटर एवढा झाला असून देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे.
का उडाला पेट्रोलचा भडका?
- आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागलं
- पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती
- सौदी अरेबिया आणि इराणमधले मतभेद टोकाला
- अमेरिकेनं इस्रायलमधला दूतावास जेरुसलेमला हलवला
- सीरियावरून अमेरिका, रशियातला तणाव वाढला
- सौदी अरेबियाकडून तेलाची निर्मिती घटली
- भारत सरकारकडून तेलावरच्या करात कपात नाही
Post A Comment:
0 comments so far,add yours