Tv9puse news network
रिपोर्टर: हर्षीता ठवकर
मुंबई: मुंबईत पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पतीनं पत्नीचे हात-पाय बांधून चाकूनं तिचा गळा कराकरा चिरुन निर्घृण हत्या केलीय. भांडुपच्या तुलेशत पाडा येथील ही खळबळजनक घटना आहे.
नेहा गुप्ता असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी पतीचे नाव बिरबल असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. नेहा आणि बिरबलमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शुक्रवारी (4 मे) सकाळीदेखील त्यांच्यामध्ये काही कारणांवरुन वाद झाले. मात्र या वादाचं पर्यवसान हत्येमध्ये झालं. बिरबलनं सुरुवातीला नेहाचे हात पाय बांधले आणि स्वयंपाक घरातील भाजी चिरण्याच्या चाकूनं तिचा गळा चिरला.
यानंतर त्यानं चोरांनी पत्नीची हत्या केल्याचा बनाव केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यानच पोलिसांना बिरबलनंच नेहाची हत्या केल्याचा संशय आला होता. मात्र सुरुवातीला त्यानं गुन्हा कबुल केला नाही. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच बिरबलनं अखेर गुन्हा कबुल केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours