मुंबई, 09 मे : मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी. मुंबई लोकलच्या सिग्नल यंत्रणेत मोठे बदल करण्यात येणार आहेत, ज्यामुळे दर अडीच मिनिटाला लोकल सोडणं शक्य होणार आहे. याचा तांत्रिक अभ्यास पूर्ण झालाय, आणि याबाबतचा प्रस्ताव आता रेल्वे बोर्डाकडे पाठवला गेलाय. CBTC, अर्थात Communication Based Train Control असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे.
कसा असेल बदल?
- लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी निर्णय
- सध्या एका तासात 16 फेऱ्या
- बदल केल्यावर तासाला 24 फेऱ्या शक्य
- दोन लोकलमध्ये सध्या 3 ते 3.6 मिनिटांचं अंतर
- बदल केल्यावर हा कालावधी 2.5 ते 2.75 मिनिटांवर
- प्रकल्पाचा एकूण खर्च - 5,927 कोटी
- लोकलचं प्रत्यक्ष लोकेशन विचारात घेतलं जाणार
- सध्या फिक्स्ड ब्लॉक तंत्रज्ञानाचा वापर
- मुंबई, दिल्ली मेट्रोमध्ये हे नवं तंत्रज्ञान वापरलं जातं
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours