पालघर: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही विरोध दर्शवायला सुरूवात केलीय.
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पालघरमध्ये या आधीच बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेलं सर्वेक्षण आणि जमिनीची मोजदात संघटनांनी बंद पाडलीय.  जिल्ह्यात बुलेट ट्रेन विरोधी समितीने येत्या ३ जून रोजी 'बुलेट ट्रेन विरोधी जनमंच' चं आयोजन केलंय. त्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours