07 मे : मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांना दिलासा दिल्यानंतर, त्यांच्या जामिनासंदर्भातल्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. सध्या छगन भुजबळ हे केईएम रूग्णालयात उपचार घेताहेत. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना घरी सोडायचं की नाही यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
पण त्यांच्या कारागृहाच्या सुटकेनंतर ठिकठिकाणी भुजबळ समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. म्हणून त्यांच्यासाठी रुग्णालयातून सुटल्यानंतर भुजबळ आज फेसबुकवरून सगळ्यांशी संवाद साधणार आहे.
दरम्यान न्यायालयाच्या परवानगीशिवाय भुजबळांना मुंबई सोडता येणार नाही आहे. त्यामुळं केईएम रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळांना मुंबईतल्या घरात हलवणार की त्यांचं होम पिच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये हलवणार हे पहावं लागेल.
पण भुजबळ यांच्या बाहेर येण्यामुळे अनेक राजकीय बदल घडणार आहेत. त्यामुळे आजच्या फेसबुक संवादातून ते कार्यकर्त्यांना काय संदेश देतात. याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण दरम्यान, भुजबळ आज रुग्णालयात थांबणार की मुंबईतील निवासस्थानी जाणार हे आज कळेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours