मुंबई,ता.16 मे: विरोधी पक्ष सातत्याने ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्सवर संशय घेत असल्यानं सरकारने एकदा मतपत्रिकेव्दारे मतदान घ्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. कर्नाटकमध्ये जे जे जिंकले त्या त्या सर्वांचं अभिनंदन आहे असं म्हणत त्यांनी भाजपला थेट शुभेच्छा देणं टाळल.
शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्या राज्यांनी भाजपच्या शासनाचा अनुभव घेतला त्या राज्यांमध्ये जनमताचा वेगळा कल असू शकतो असंही ते म्हणाले. वनगा कुटूंबियांना न्याय देण्यासाठीच ही निवडणूक आहे असंही ते म्हणाले.
Post A Comment:
0 comments so far,add yours