16 मे : चंद्रपूर जिल्ह्यात जखमी बिबट्यावर उपचार करण्यासाठी गेलेल्या वनअधिकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आलीय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. चंद्रपुर शहरालगत असलेल्या लोहाराजवळ मंगळवारी एका वाहनाच्या धडकेनं बिबटया जखमी झाला होता. त्याच्या उपचारासाठी गेलेल्या संतोष थिप्पे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे.
बिबट्यावर उपचार करण्यासाठी वनअधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र बिबट्यानंच वनअधिकाऱ्याच्या अंगावर झडप घातली. या हल्ल्यातून वनअधिकारी थोडक्यात बचावलाय. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बेशूद्ध करण्यात वनअधिकाऱ्यांना यश आलं आहे.
या दरम्यान बिबट्याने वनपरिक्षेञाधिकारी संतोष थिप्पे यांच्यावर हल्ला केला. जोरात धावुन बिबट्या अंगावर धावुन आल्याने सगळे घाबरुन गेले एकच आरडा ओरड सुरु झाली. या ओरडी दरम्यान बिबटयाला थोड दुर हुसकावण्यात आलं. तब्बल चार तासानंतर बिबटयाला बेशुध्द करुन जेरबंद करण्यात आलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours