भंडारा. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व पक्षांचे समाधान करून, सामान्य मतदारांचा लोकशाही व निवडणूक प्रणालीवर विश्वास कायम राहिल याकरिता इव्हीएम मशीन अनुसार मतांची संख्या व व्हीव्हीपॅट मशीन मधून निघालेल्या पावतींची मोजणी करण्याची मागणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील विदर्भ माझा पक्षाचे उमेदवार अक्षय योगेश पांडे यांनी केली आहे.
विदर्भ माझा पक्षाचे उमेदवार अक्षय योगेश पांडे यांनी सांगीतले की लोकशाहीमध्ये निवडणूकीच्या माध्यमातून मतदार आपले प्रतिनिधींची निवड करतात. या प्रक्रियेमुळे लोकशाहीला बळकटी मिळते. परंतु गेल्या काही निवडणूकीमध्ये झालेल्या प्रकारामुळे मतदारांमध्ये संशय बळावत आहे. ही स्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आहे याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. 
इव्हीएम बद्दल संशय दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने इव्हीएम ला व्हीव्हीपॅट मशीन जोडली. तरी देखील इव्हीएम बद्दल लोकांच्या मनातील संशय दूर झालेला नाही, हि वस्तुस्थिति ही. उलट कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये हुबळी सेंट्रल मतदार क्षेत्रात झालेल्या गोंधळामुळे या संशय अधिकच दाट झालेला आहे.
या करिता इव्हीएम मशीन अनुसार मतांची संख्या व व्हीव्हीपॅट मशीन मधून निघालेल्या पावतींची मोजणी करण्यात यावी. त्यामुळे प्रक्रियेशी संबंधित सर्व पक्षांचे समाधान करता येईल. 
तसेच मतदानादरम्यान इव्हीएम यंत्राना रीमोट द्वारे संचालित करून मतदानाच्या आकडयामध्ये फेरफार करता येतो, असा समज आहे. हा समज दूर करण्याकरीता मतदान केंद्र परिसरामध्ये जॅमर लावण्यात यावा. व्हीव्हीपॅट पावतींना सुरक्षित ठेवण्यात यावे. मतदारांचा लोकशाही व निवडणूक प्रणालीवर विश्वास कायम राहिल याकरिता सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी विदर्भ माझा पक्षाचे उमेदवार अक्षय योगेश पांडे यांनी केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours