03 मे : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात वितरण होणार आहे. मात्र पुरस्कार वितरणात वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे व्यस्त वेळेमुळे सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
थोड्याच वेळात यासंबंधी दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल. 66 पुरस्करार्थींपैकी जवळ जवळ 60 कलाकारांनी बहिष्कार करणार असल्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या करून पाठींबा नोंदवला आहे. प्रादेशिक कलाकारांनीही यावर ठाम भूमिका दर्शवली आहे. पण दरम्यान, राष्ट्रपती प्रदान करणार असलेले हे अकरा पुरस्कार नेमके कोणते हे अद्याप स्पष्ट नसलं तरी आधी तांत्रिक पुरस्कार आणि नंतर मुख्य पुरस्कार असा क्रम असतो, असं सूत्रांनी सांगितलं.
या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर विजेत्यांना पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. परंतु, चित्रपट महोत्सव विभागाच्या संचालकांकडून विजेत्या कलाकारांना या सोहळ्याच्या रंगीत तालमीसाठी पाचारण करण्यात आले तेव्हा 107 पुरस्कार हे स्मृती इराणींच्या हस्ते दिले जातील, अशी माहिती देण्यात आली. तेव्हा कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट लघुपट विषेश पुरस्कार - नागराज मंजुळे, पावसाचा निबंध
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - म्होरक्या
सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट - मयत
सर्वोत्कृष्ट संकलक - मृत्यूभोग
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अमित मसुरकर, न्यूटन
विशेष लक्षवेधी अभिनेता - पंकज त्रिपाठी, न्यूटन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी ( मरणोत्तर) मॉम
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर - ए आर रेहमान, मॉम
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर - गणेश आचार्य, लठ मार.. टॉयलेट एक प्रेमकथा
सर्वोत्कृष्ट अॅक्शन डिरेक्टर - अली अब्बास मुघल
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स - बाहुबली - द कनक्लुजन
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बाहुबली द-कनक्लुजन

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours