रिपोर्टर..बंडु मलोडे
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु सकाळपासूनच बहुतांश मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. दरम्यान, मंगळवारला निवडणूक आयोगाने ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज सुरू असलेल्या मतदान केंद्रातील एकाही ईव्हीएमध्ये बिघाड आलेला नाही. सर्वच मशिनस आॅल इज वेल असून फेरमतदान सुरू आहे. आज बुधवारला एकाही ईव्हीएममध्ये बिघाड नाही आणि सोमवारला शेकडो ईव्हीएममध्ये बिघाड का आला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी गुजरात राज्यातील सुरत येथून ईव्हीएम मागविण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यावर आक्षेप घेतला होता. कोणत्याही निवडणुकीसाठी जेवढ्या मशिन्सची गरज असते त्यापैकी १० टक्के मशिनची रॅण्डम पद्धतीने तपासणी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामुळे या निदेर्शांनुसार ईव्हीएमची तपासणी करण्याची मागणी खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. परंतु या ईव्हीएमची तपासणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर मतदानाच्या दिवशी या ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडाचा प्रकार समोर आला.

त्यानंतर फेरमतदान होण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूक विभागाने ईव्हीएमची मागणी केली असता आयोगाने महाराष्ट्रातील सांगली व मध्यप्रदेशातील कांकेर येथून ईव्हीएम पाठविले आहे. हेच ईव्हीएम आज बुधवारला ४९ मतदान केंद्रावर फेरमतदानासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापूर्वी गुजरातहून आणलेल्या ईव्हीएम मुख्यालयात जमा करून ठेवलेल्या आहेत. दरम्यान, नव्याने रूजू झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कादंबरी बलकवडे या संपूर्ण मतदान केंद्रांवर लक्ष ठेऊन आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours