भारतीय जनता पक्षाला ‘अच्छे दिन’ आणणारे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचा आज स्मृतिदिन, मात्र प्रदेश भाजप आणि केंद्रातील भाजपने प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते. भाजपचे नेते प्रमोद महाजन यांना विसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रमोद महाजन यांचे ३ मे २००६ रोजी निधन झाले. महाजन यांच्या निधनाला एक तप झाले. या काळात भाजपला महाजन यांच्या पक्षातील योगदानाचा पूर्णपणे विसर पडला. मराठवाड्यातील अंबाजोगाई ते दिल्लीपर्यंतच्या राजकीय प्रवासात युवा मोर्चा अध्यक्ष, भाजपचे अनेक वर्षे सरचिटणीस, प्रवक्ते, लोकसभा खासदार, राज्यसभा सदस्य, वेंâद्र सरकारमध्ये संरक्षण, संसदीय कामकाज, माहिती प्रसारण, दूरसंचार अशा विविध खात्यांचे मंत्रीपद महाजन यांनी सांभाळले होते. भाजपची बांधणी करून पक्षाला सत्तेपर्यंत पोहचविणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रातील आणि वेंâद्रातील अनेक भाजप नेत्यांना महाजन यांनीच घडविले. अशा या नेत्याचा विसर भाजपला पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पंतप्रधानांकडून ट्विटही नाही

ऊठसूट कोणत्याही घटनेवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रमोद महाजन यांना विसरले. महाजन यांच्या स्मृतिदिनी पंतप्रधानांनी साधे ट्विटही केले नाही. वेंâद्रातील मंत्री, नेतेही विसरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours