कॉंग्रेसला पर्याय म्हणून 2014 मध्ये जनतेने नरेंद्र मोदींच्या हातात एक हाती सत्ता दिली.सत्ता हातात आल्यावर मोदी सरकार हुकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत. सरकार मस्तवालपणे एकेक करून जनविरोधी निर्णय घेत आहे.
मोदी सरकारच्या गत चार वर्षात देशात मागासवर्गीय दलित,आदिवासी, मुस्लिम अल्पसंख्याक यांच्या वरील अत्याचारात कमालीची वाढ झाली आहे. देशाला शरमेने मान खाली घालविणारे ऊना प्रकरण,विद्यापीठीय संस्थागत रोहित वेमुला हत्त्या प्रकरण, युपीतील अखलाख प्रकरण, कॉं.गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्त्या,भीमाकोरेगाव हल्ला प्रकरण,आरक्षण समर्थक नऊ लोकांची हत्त्या,कठुआ सामुहिक बलात्कार -हत्त्या, व अन्य शेकडो अन्याय अत्त्याचाराची प्रकरणे जाणीव पुर्वक घडविण्यात आले.
देशात अन्याय-अत्त्याचाराची प्रकरणे होत असताना आणि मोदी सरकार लोकशाही विरोधात नोटबंदी,आधार लिंक,ईव्हीएम घोटाळा, सरकार सीबीआय-सुको-निवडणूक आयोग यांचा मनमानीपणे वापर करून घेणे वा असे इतरही एकेक निर्णय घेत असताना या सर्व घटनांच्या विरोधात देशात पहिला आवाज उठवला तो मा.अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी. मोदी सरकारच्या कारभाराला आणि आरेसेसच्या घातक नीतीला आव्हान देणारे बाळासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती होय !
कथीत भ्रष्टाचार प्रकरणाच्या आडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सरकारने ब्लॅकमेलींग करून विरोधकांना घाबरून घरी बसविण्याचा प्रसंगी जेलमध्ये टाकण्याचा सपाटा लावला. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने वेळोवेळी केला. यामुळे गेली तीन साडेतीन वर्षे मा.बाळासाहेब आंबेडकर वगळता विरोधकांना चूप बसविण्यात सरकारला चांगलेच यश आले होते.ह्या सर्व बाबी लोकशाहीला मारक आहेत हे बाळासाहेब आंबेडकरांनी ओळखले. त्यांनी बड्या विरोधी पक्षातील अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. स्वस्थ न बसता मोदींचा मुकाबला करण्याचा सल्ला दिला.आणि गेल्या तीन चार महिन्यां पासून विरोधक काही प्रमाणात मोंदींच्या विरोधात आवाज उठवायला लागला आहे याचे संपूर्ण श्रेय बाळासाहेब आंबेडकरांनाच आहे. वन म्यान आर्मी म्हणून बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी मोदींच्या हिटलरशाही विरोधात सुरूवाती पासूनच आघाडी घेतली आहे.आज मोदी सरकारच्या विरोधात जे वातावरण तयार झाले आहे त्यात बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका अग्रक्रमाची आहे हे विसरून चालणार नाही.बाळासाहेब आंबेडकरांची हि भूमिका व्यक्तीगत,जातीगत विरोधातील नसून राज्यघटना- लोकशाही वाचवण्यासाठी आणि शोषित वंचित, आदिवासी, दलित, अलुतेदार बलुतेदार, अल्पसंख्याक यांना न्याय देणारी मैलाचा दगड ठरणारी आहे.
केंद्रात मोदींच्या विरोधात तसा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नाकात दम आणला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने मराठा विरुद्ध आंबेडकरी बौद्ध यांच्यात गैरसमज पसरून दंगे भडवण्याचे षडयंत्र उघडे पाडण्याचे काम असो किंवा भीमा कोरेगावात अलुतेदार बलुतेदार यांच्यावरचे एकतर्फी हल्ला प्रकरणी देवेंद्र सरकारला जेरीस आणण्याचे काम बाळासाहेब आंबेडकरांनी केले आहे. मुंबईसह उभा महाराष्ट्र कडकडीत ऐतिहासिक बंद असेल किंवा दि 26/3चा लाखोंचा एल्गार मार्च असेल यातून देशाने मा.बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय आणि सामाजिक ताकद पाहिली अनुभवली.महाराष्ट्रात कुठेही जा तिथे फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्य कर्तृत्वाचीच चर्चा दिसेल.
अशा वातावरणात भंडारा- गोंदियात लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे.या मतदारसंघातून 1954 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती त्याचाही एक ऐतिहासिक संदर्भ आहे.अशावेळी मा.बाळासाहेब आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघा तर्फे आपला उमेदवार निवडणूकीत उतरविण्याचे जाहीर केले आहे. सोबतच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अशोकजी सोनोने यांनी कॉंग्रेस पक्षाने भारिप बहुजन महासंघाला पाठिंबा द्यावा अशी राजकीय अपेक्षा व्यक्त केली आहे.आणि ती आजच्या घडीला रास्तही आहे.2019 सार्वत्रिक निवडणूकीत विजयाचा मार्ग प्रशस्त होण्यासाठी कॉंग्रेसने भारिप बहुजन महासंघाला पाठिंबा देण्याची गरज आहे.
(ता.क.:कॉंग्रेसचा हा पाठिंबा मा.बाळासाहेब आंबेडकर यांना वैयक्तिक नसेल ! तर मा.बाळासाहेब आंबेडकरांनी जे शोषित- पीडित-आदिवासी-अलुतेदार बलुतेदार-दलित-आंबेडकरी-अल्पसंख्याक-ओबीसी यांच्या प्रश्नांची जी लढाई लढली वा लढत आहेत त्याचे समर्थन म्हणून कॉंग्रेसचा पाठिंबा अपेक्षित आहे. या पाठिंब्यामुळे देशात कॉंग्रेसबद्दल एक पॉझिटिव्ह मेसेज जाणार आहे व सोबतच कॉंग्रेसच्या पाठिंब्यामुळे संभाव्य निवडणूकीतील यशामुळे मोदी विरोधी म्हणून मुलूखमैदानी तोफ व राजकीय धुरीण मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने विरोधकांना जोडीला मिळणार आहे. )
सुरेश शिरसाट
Post A Comment:
0 comments so far,add yours