रिपोर्टर- परदेशी

भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे, तोच जिल्ह्यातील निवडणुकीच्या राजकारणात रंगतदार तालीम सत्ता व विरोधी पक्षांकडून पाहायला मिळत आहे. यात मतदाराला विविध प्रकारचे प्रलोभने देऊन सत्ता पक्षाकडून रिझविण्याचे काम करण्यात येत आहे. असाच काही प्रकार सरकारकडून करण्यात आला आहे.  सहा महिन्यांआधी सरकारकडून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक क्षेत्रात धान पिकावरील तुडतुड्यामुळे अर्धीअधिक पिके उध्वस्त झाली होती. त्यावर विरोधी पक्षाने तुडतुड्याने उध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकNयांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी कडून करण्यात आली होती. या मागणीला तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटला असताना ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान भाजप सरकारकडून २६ ते २८ या कालावधीत पुर्णवेळ बँका सुरू ठेऊन शेतकNयांना नुकसान भरपाईची रक्कम प्रदान करण्याचे आदेश जिल्हाधिकाNयांमार्पâत जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांना देण्यात आले. सरकारकडून सर्रासपणे आचारसंहितेचे उल्लंघन करीत असताना देखील निवडणुक आयोगाची बारीक नजर कुठे अदृश्य झाली याचे आश्चर्य जनतेत चर्चिल्या जात आहे. सहा महिन्यांपासून झोपेत असलेल्या अच्छेदिनाच्या सरकारला ऐन निवडणुकीत शेतकNयांची आठवण झाल्याचे आठवत आहे.  निवडणुकीत भाजपला तुडतुड्याची भिती का बर वाटावी असा प्रश्न आता जनतेला होत आहे.

तर दुसरीकडे सुरतवरून आयात करून मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे. आज नाना पटोले यांनी पत्रपरिषदेतून ईव्हीएम मशिनवर पुन्हा हल्लाबोल करीत सर्वच ईव्हीएम मशिनची तपासणी केल्याशिवाय मतदान वेंâद्रावर पाठविण्यात येऊ नये अशी मागणी निवडणुक आयोगाकडे जरी केली असली तरी सरकारचे बंदे मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करीत आहेत. अनेक ठिकाणी तपासण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनची त्या-त्या पक्षाच्या कार्यकत्र्यांना शहानिशा न करू देता पाठविण्यात आल्याचा आरोप इतर पक्षांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे होणारे मतदान नेमके कुणाला जाणार याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

होणारी पोट निवडणुक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली असून यात साम,दाम दंड भेद या सर्व कुल्प्त्यांचा भाजपच्या पदाधिकाNयांकडून वापर केला जात आहे. त्यामुळे सरकारकडून एकीकडे तुडतुड्याचे राजकारण तर दुसरीकडे ईव्हीएमचा घोळ यामुळे भाजपची नक्कीच नाचक्की होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.  मतदानापूर्वीच दोषपुर्ण ईव्हीएमवर आक्षेप घेऊनही निवडणुक आयोगाकडून त्यावर ठोस कोणतही उपाययोजना करण्यात येत नसल्याची ओरड काँग्रेस व राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. तर सरकारकडूनच थेट आचारसंहितेचे उल्लंघन करीत मतदानाच्या दिवशी तुडतुड्याने नुकसान झालेल्या शेतकNयांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुर्णवेळ बँका सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने यावर निवडणुक आयोग कोणतही कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण या पोट निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई लढणारे नाना पटोले यांनी पत्रपरिषदेतून भाजपच्या या नितींवर हल्ला चढवित ईव्हीएम मशिनमधून बहुमत प्राप्त करणारे हे भाजप सरकार आहे. या सरकारला जनसामान्यांच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नसल्याची चिंत व्यक्त केली. तर भाजपकडून अंहकार तोडण्याची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे या पोट निवडणुकीत भाजपला तोंडघशी पडावे लागल्यास भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेला आगामी काळात अहंकाराच्या राजकारणाला सामोरे जावे लागेल हे निश्चित झाले आहे. परंतु सध्या तरी भाजप सरकारला तुडतुड्याची भिती लागली आहे हे मात्र निश्चित झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours