पालघर, 31 मे : पालघर लोकसभा पोडनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीये. शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीत काँग्रेसचा खुर्दा पडण्याची शक्यता निर्माण झाली. पाचव्या फेरीअखेर काँग्रेस चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावितांना गावित यांना 1,13,183 मतं तर शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना 95,772 मतं मिळाली असून आता ते दुसऱ्या स्थानावर आहे. तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव ७८,१८५ मतं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. तर काँग्रेसचे दामू शिंगडा यांना 16809 मतं मिळाली आहे.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक होतेय. दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारीही दिली. तर भाजपनं काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक सुरशीची बनली आहे. बहुजन विकास आघाडीने त्यांचे माजी खासदार बळीराम जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी दिलीय. दामू शिंगडा हे काँग्रेसचे उमेदवार आहेत.
२००८ च्या फेररचनेत हा मतदार संघ तयार झाला. पालघर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात – डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई. २८ मे रोजी इथं  51 टक्के मतदान झालंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours