मुंबई, ता. 31 मे : राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुडंकर यांचे पहाटेच्या सुमारास मुंबईच्या के.जे. सोमय्या रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीवर मोठं संकट कोसळं असं म्हणायला हरकत नाही. पांडुरंग फुंडकर यांचा जन्म 21 ऑगस्ट 1950 रोजी खामगाव तालुक्यातील नरखेड या छोट्याशा गावी झाला आणि आज 21 मे 2018 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या अकाली जाण्याने एक नजर टाकूयात त्यांच्या राजकीय प्रवासावर...
पांडुरंग फुंडकर यांचा राजकीय प्रवास...
- पांडुरंग फुंडकर यांचा प्रवास सुरू झाला तो भारतीय जनता पक्षातून. सर्वात पहिल्यांदा अकोला लोकसभा मतदार संघातून निवडणुका लढवत त्यांनी सलग 3 वेळा विजय मिळवला होता.
- त्यानंतर फुडंकर यांच्याकडे काही काळ भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद होते. तसंच त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ही स्वीकारली होती.
- दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचं वर्चस्व होतं. अशात भाजपच्या पक्षवाढीसाठी फुंडकर आणि भाजपचे दिवंगत जेष्ट नेते गोपिनाथ मुंडे यांनी अनेक काम केली.
- शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला ग्रामीण भागापर्यंत नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजप पक्षाचे मोठं नुकसान झालं अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
- कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेब नावानं ओळखल्या जाणाऱ्या फुंडकर यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये धडाडीने काम केलं आहे. त्यांच्या कामामुळे आणि विचारसरणीमुळे पक्षात भाजपचे विर्दभातील ओबीसी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे.
- पांडुरंग फुंडकर हे असे राजकीय नेते होते ज्यांनी नेहमी प्रसारमाध्यमांपासून लांब राहून मोठी कामगिरी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours