मुंबई, 20 जून : राज्यभर सुरू असलेला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप शेवटी मागे घेण्यात आला आहे. राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 2700 प्रशिक्षणार्थी डॉक्टर वेतनवाढीसाठी 13 जूनपासून बेमुदत संपावर होते. दरम्यान काल संध्याकाळी सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी डॉक्टरांनी केलेल्या मागण्या 2 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वाढीव वेतने हे येत्या 2 महिन्यात देण्याचंही कबुल करण्यात आलं. तसेच संपात सहभागी असणाऱ्या डॉक्टरांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे रुग्णांचे मोठे हाल होत होते. पण हा संप मागे घेतल्यामुळे आरोग्यसेवा आता पुन्हा सुरळीत होईल. पण 2 दोन महिन्याच्या आत आता सरकार यांच्या वेतवाढीवर काय निर्णय घेणार ते बघणं महत्त्वाचं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours