सपादीका... सुनिता परदेशी
स्मार्ट ग्राम कीन्ही/गुंजेपार जि.भंडारा येथिल माजी सरपंच स्व.बंडूजी उर्फ बुद्धेश्वरजी शहारे यांचे दि.२२/६/२०१८ ला शहापूर/भंडारा या ठिकाणी अपघाती निधन झाले होते. ते सक्रिय तसेच सामाजिकतेची जाणीव असलेले प्रगतिशील कार्यकरते असल्याने, व त्यांच्या अवेळी निधनाने त्यांच्या कुटुंबावर जी दुःखाची कुऱ्हाड कोसळली त्यांचे सांत्वन करणे गरजेचे होते. म्हणून समाज मनाची जाणीव असलेले नानाभाऊ पटोले माजी खासदार, तसेच उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी. हे आवर्जून त्यांच्या कुटूंबाची भेट घेण्यास आले व कुटुंबीयांची सांत्वना केली. या सांत्वना भेटीच्या वेळी त्यांच्या सोबत स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त सरपंच उत्तम भागडकर सरपंच गुंजेपार/किन्ही, विकास वासेकर, उदय भैय्या, गटनेते रामचंद्र राऊत, वामन मिसार, , मंगेश दाणी तिलकचन्द शहारे, अमीर नंदागवळी, सुनील तालमले, सुभाष खिलवानी, प्रमोद दाणी, नंदू पिलारे, अर्जुन दाणी व शेकडो गावकरी उपस्थित होते. तसेच त्या दिवशी सकाळपासूनच पाऊस कोसळत होता, तरी परंतु मनात जिद्द असेल तर कार्यात कोणीच अडथळा आणू शकत नाही, ह्या उक्तीचा परिचय देत लोकनेते नानाभाऊ पटोले यांनी स्व बंडूजी उर्फ बुद्धेश्वरजी शहारे माजी सरपंच यांचे घरी भर पावसात सांत्वना भेट घेतली. तसेच श्री सुखदेवजी पिलारे सर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, यावेळी साहेबानी आपल्या स्वभावाचा व सेवाभावी वृत्तीचा परिचय समाजाला दिला.
Post A Comment:
0 comments so far,add yours