सपादीका... सुनिता परदेशी
समाजातील कुप्रवुत्तीचा नायनाट करण्यासाठी, बहुजनांच्या प्रगतीसाठी. अहोरात्र झटणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज, विध्यार्थाना मोफत शिक्षण मिळावं, एक आदर्श विध्यार्थी घडविण्यासाठी लागणारे, सर्व कसब पणाला लावून राज्याची प्रगती साधण्यासाठी, एक आदर्श समाज निर्मितीसाठी, विध्यार्थी घडला पाहिजे, त्यातून आदर्श माणसाची निर्मिती झाली पाहिजे. तसेच बुद्ध फुले कबीर शाहू आंबेडकर यांच्या विचाराची पुनरावृत्ती होत राहावी, असा विचार देणारे आणि त्याच विचारांना घेऊन हि शाळा निर्मीती मागचे रहस्य आहे. आज ह्या दि. बुधिस्ट इंटरनेशनल स्कूल औरंगाबाद शाखा लाखांदुर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने ते बोलत होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना, व्यक्ती जर शिक्षित असेल, तर बुद्धी प्रगती पथावर असेल, शिक्षणाने माणसांच्या आचाराची विचाराची उत्तरोत्तर प्रगती होत राहते, शिक्षित व्यक्ती स्वतः सोबत समाजालाही प्रगती पथावर आणण्यासाठी विचार करतो. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जीवनात तोच आदर्श ठेवला, विज्ञानवादि दृष्टिकोनातून, अनिष्ट रूढी परंपरांना, त्यांनी हद्दपार केले. विज्ञानावर आधारित समाजरचनेचा पाया बांधण्याचे काम राजश्री शाहू महाराजांनी केले. असे विचाराचे प्रतिपादन स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गुंजेपार/किन्ही चे सरपंच उत्तम भागडकर यांनी केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours