बार्शी, 29 जून : नात्याला काळीमा फासणारी घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या खांडवी गावात घडलीय. सख्ख्या मोठ्या भावानंच लहान भावाचं संपूर्ण कुटुंब संपवलंय. रामचंद्र देवकते या सख्ख्या मोठ्या भावाने आपला छोटा भाऊ राहुल याच्यासह आई, भावाची बायको सुषमा आणि मुलगा आर्यन याच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून दिल्याची घटना घडलीय.
यामध्ये राहुल यांची बायको सुषमा आणि आर्यन हे भाजून जागीच मयत झालेत. तर राहुल आणि त्याची आई आणि आरोपी रामचंद्र देवकते हे तिघेही गंभीर जखमी आहेत. उस्मानाबाद येथील सिव्हिल हाॅस्पिटल येथे उपचारासाठी तिघांना दाखल केले असून यामध्ये राहुल याचे भाजण्याचे प्रमाण जास्त आहे. आरोपी रामचंद्र देवकाते याने त्याची पत्नी आणि दोन मुलांना दुसऱ्या खोलीत बंद करून बाहेरून कडी लावल्यामुळे ते सुखरूप आहेत.
जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याचे सांगितले जातेय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेमुळे खांडवी गावात शोक व्यक्त केला जातोय...
Post A Comment:
0 comments so far,add yours