Tv9pluse News
मुंबई : बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती याचा आज 68वा वाढदिवस. त्याचं खरं नाव हे गौरांग चक्रवर्ती असं होतं. पण त्याने सिनेमासाठी मिथुन हे नाव ठेवलं. मिथुनच्या सिनेमांसोबतच त्याचे अनेक अफेअर्स नेहमीच चर्चेत राहिलेत. त्याचं नाव रंजीता, योगिता बाली, सारिका या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं पण सर्वात जास्त चर्चा झाली ती श्रीदेवीसोबतच्या अफेअरची.
1984 मध्ये 'जाग उठा इन्सान' सिनेमात पहिल्यांदा मिथुन आणि श्रीदेवी एकत्र आले. या सिनेमाच्या शूटिंगवेळी दोघांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली होती. मिथुनने स्वत: एका मुलाखतील हे मान्य केले होते की, त्याने श्रीदेवीसोबत लग्न केले होते.
मिथुनची पत्नी योगिता बालीने स्वत: एका मुलाखतीत हा खुलासा केला होता की, तिला मिथुन आणि श्रीदेवीच्या लग्नाबाबत माहिती होती. एका न्युजपेपरने तर दोघांच्या लग्नाचं सर्टिफेकेटही प्रकाशित केलं होतं.
पण दोघांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. याचं कारण मिथुनची पत्नी योगिता ही होती. श्रीदेवी सोबतचं नातं तोडलं नाहीतर मी आत्महत्या करेन अशी धमकी योगिताने मिथुनला दिली होती. त्यामुळे त्याने श्रीदेवीची साथ सोडली होती.
मिथुनने 350 पेक्षा जास्त सिनेमात काम केलंय. त्याच्या डान्स आणि अॅक्शनची इतकी क्रेझ होती की, त्याचे लागोपाठ 33 सिनेमा फ्लॉप झाल्यानंतरही त्याने 12 सिनेमे साईन केले होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours