रिपोर्टर:-हर्षीता ठवकर

भंडारा - मौजा जुनी टाकडी हे गाव पुरपीडित असल्यामुळे सन १९६१-६२ ला नवीन टाकडी, भगतसिंग वॉर्ड या नावाने पिंगलाई मौजा खास भंडारा येथील गट क्रं.१६८/१,१६८/२ व १६८/३ या सरकारी जागेवर शासनाने पुनर्वसन करून दिले. तेव्हापासून आम्ही सर्व दलित समाजाचे बांधव या ठिकाणी वास्तव्य करून राहत आहोत. आमच्या घराच्या मागे सरकारी ३० फूट जागा खुली होती  व त्या ठिकाणी संदप्सनी वाहण्यासाठी सरकारी नाली होती. परंतु गैर अर्जदार यांची शेतजमीन या जागेला लागू आहे. सादर जागा शासनाची असून सन १९६१-६२ पासून आमच्या घराच्या मागील बाजूला सांडपाणी वाहून जाण्यासाठी शासनाने स्वतःच्या पैशाने व नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मोकळी जागा सोडली होती. त्यामुळे ४१ कुटुंब याचा वापर करीत होते. परंतु वरील गैरअर्जदाराने कायदेशीर जमिनिचे मोजमपन न करता ४१ कुटुंबाची सांडपाणी वाहून जाण्याचीनाली जोरजबरेने बंद केली व जे.सी.बी मशीन ने तोडून फेकली. प्लॉट नं ३१ ला लागून अवैद्यरित्या घराचे बांधकाम सुरू केले. सांडपाणी व येणाऱ्या पावसाचा पाणी जमा होऊन मोठयाप्रमानात नुकसान होऊन रोगराई पसरण्याची दाट श्यक्यता आहे यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व दलित समाजाने पावसाळ्यात घर कोसळून पडण्याची दाट शक्यता झालेली आहे .


यासंदर्भात मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.त्यामुळे नगर  परिषद येथील कर्मचारी मोका चौकशीला आलर असता गौरार्जदारांने त्यांच्यावर हमाल केला व शासकीय  कामात अडथळा निर्माण केला व आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली आहे. सदर अवैध बांधकाम तात्काळ बंद करून सार्वजनिक नाली व रास्ता मोकळा करून देण्यात यावा यासाठी अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांना प्रत्येक्ष भेटून निवेदन दिले परंतु अजून पर्यंत न्याय मिळालेला नाही त्यामुळे नाईलाजास्तव लोकशाई मार्गाने आज दि.१८/०६/२०१८ ला सकाळी ११ वाजता पासून मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कार्यालय भंडारा समोर न्याय मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणावर बाबू मेश्रामे, रुपंचांद मेश्राम, शुक्राचार्य डोंगरे, लिलाबाई डोंगरे, कांताबाई शेंडे,नागबाई शेंडे, भागाबाई बागडे, लक्ष्मी उके,सत्यभामा शेंडे, राजकुमार उके, मंसाराम शेंडे या अन्याग्रस्त पीडितांनि सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे,हिवराज  उके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. याला समर्थन सुरज कुथे, नानेश्वर निकुरे, मधुकर येरपुडे, पप्पू भोपे, प्रकाश देशकर, शिवा गायधने, दीपक मेश्राक सुरेंद्र उके, म्लान उके गानेश रहाटे, लोकनाथ उके, सुधीर उरकुडे, संतोष उरकुडे,सौ. सुप्रिया उके,शेवंता चौधरी, दिनेश झाडे, अरविंद लोणारे,यशोधरा लोणारे यांनी दिला असून मागण्या पूर्ण न झाल्यास आय. टि. आय समोर चक्क जॅम करण्याचा इशारा दिला आहे.

विडियो देखे- 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours