मुंबई : काल झालेल्या मान्सून पूर्व पावसानं राज्यभर हजेरी लावली. आजही राज्यासह अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पण या पहिल्या पावसातच मुंबई पाण्याखाली तुंबली. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला आहे.
मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस मुंबई, ठाण्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने तसेच विजा कडाडू लागल्याने उपनगरातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
केरळात दाखल झालेला मान्सून हळहळू पुढे सरकत असून दक्षिणेकडील विविध भागांत पाऊस पसरला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. त्यानंतर मुंबईतही सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस दाखल झाला आहे.
मुंबईच्या वसईतही विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून कडकडाटामुळे वीज गायब झाली आहे. परिसरात लाईट नसल्याने नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
डोंबिवली परिसरात गेल्या काही वेळापासून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतोय. जोरदार वाऱ्यामुळे सावरकर रोडवरील एक झाड पडलं. हे झाड ओव्हर हेड वायरवर पडल्याने सर्व ओव्हरहेड वायर रस्त्यावर आल्या आहेत. परिसरात आता लाईट गेली असून घटनास्थळी फायरब्रिगेड पोहचली आहे.
नवी मुंबईतही जोरजार पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसातच मुंबईच्या रेल्वेचं कंबरडं मोडलं. ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
रायगड जिल्ह्यात काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. माणगाव खोपोली, पेण, वडखळ, पनवेल परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वर्ध्यातही धोधो पाऊस पडतोय. मान्सूनपूर्व पावसाने वर्धेकर सुखावले आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या वर्धेकरांना आज सायंकाळी अचानक झालेल्या जोरदार पावसाने दिलासा मिळालाय.
जिल्ह्याच्या सिंदी, सेलूसह समुद्रपूर, देवळी, पुलंगाव येथे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज तीसऱ्या दिवशीही विजेच्या कडकडाटासह  जोरदार पाऊस झाला. दापोली, खेड, मंडणगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पण पावसामुळे वीज गायब झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours