नागपूर: तूर आणि चणा खरेदी केल्यानंतर बाजार समित्यांना पैसे देत नाही, असं सरकार म्हणतंय. मग बाजार समित्या जगणार कश्या? असा सवाल करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिलाय. तसंच तुमच्या डोक्यात लोकशाही गेली असेल तर तुमच्या पैश्यातून बाजार समितीतल्या निवडणूक घ्या असा टोलाही त्यांनी लगावला.
नागपूर पावसाळी अधिवेशनात आज माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाला खडेबोल सुनावले. सरकारचं धोरण बाजार समित्यांच्या विरोधात आहे. बाजार समित्यांकडे उत्पन्नाचं साधन नाही. बाजार समित्या बंद पडल्या तर स्पर्धा संपेल आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असं खडसे म्हणाले.
तसंच तूर आणि चणा खरेदी केल्यानंतर बाजार समित्यांना पैसे देत नाही, असं सरकार म्हणतंय. मग बाजार समित्या जगणार कश्या? असा सवालही खडसेंनी उपस्थितीत केलाय. जर तुमच्या डोक्यात लोकशाही गेली असेल तर तुमच्या पैश्यातून बाजार समितीतल्या निवडणूक घ्या असा टोलाही लगावला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours