परळी: मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी परळी तहसील कार्यालासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलयं. मराठा आरक्षण जाहिर केल्यानंतरच नौकरभरती सुरु करा या मागणीसह, मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकाची ऊंची एक इंचही जरी कमी केली तर या सरकारला अरबी समुद्रात बुडवू असा इशारा आंदोलकांनी दिलाय.
मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी परळी तहसीलसमोर ठिय्या आंदोलन सुरु केलय. या आंदोलनामुळे मराठा मोर्चाचं भगव वादळ परत मुंबईच्या दिशेने सरकतेय की काय अशी शक्यता र्निमाण झालीय. आंदोलनात सहभागी मराठा समर्थक आणखीन आक्रमक झाले असून, मुंबईच्या अरबी समुद्रत उभारण्यात येणार असलेल्या छत्रपतींच्या स्मारकाची ऊंची एक इंचानेही जरी कमी केली, तर या सरकारला त्याच समुद्रत बुडवू असा खरमरित इशारा आंदोलकांनी दिलाय. परळी येथे दुपारपासून सुरु अललेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी जोपर्यत मुख्यमंत्री आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत येथुन उठणार नाही असा पवित्रा घेतलाय.
दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरातही पाऊल ठेऊ देणार नाही असाही इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय. मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत एकमुखी  हा निर्णय घेण्यात आला होता. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मुख्यमंत्र्यांना महापूजाही करू देणार नाही असाही निर्णय मराठा मोर्चाकडून घेण्यात आला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours