मुंबई,ता.4 जुलै : अंधेरीतल्या रेल्वेपुलाच्या दुर्घटनेमुळं मुंबई ज्या विद्यार्थ्यांना आज मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा देता आल्या नाही त्यांची पुन्हा परिक्षा घेण्यात येईल असं विद्यापीठानं जाहीर केलंय. मुसळधार पावसाने अंधेरी रेल्वे स्टेशनवरचा पुल कोसळला आणि पश्चिम रेल्वेवरचा अप आणि डाऊन मार्ग बंद झाला त्यामुळं हजारो प्रवाशांचे हाल झाले. तर पावसामुळं रस्त्यावरही प्रचंड ट्राफिक झाल्याने विद्यार्थी परिक्षेला पोहोचू शकले नाहीत.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचं सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर करणार असल्याची माहितीही विद्यापीठानं दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या एमएससी प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या आज परिक्षा होत्या. बंद असलेली पश्चिम रेल्वे, संथ गतीची वाहतूक आणि मुसधार पावसामुळं उशीरानं धावत असलेली मध्य रेल्वे यामुळं विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजेसमध्येच पोहोचता आलं नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांना फटका बसला. तर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनानं तातडीनं निर्णय घेत फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours