रिपोटर   ...जाफरी. महाराष्ट्र क्राईम
भंडारा२३ जुलै
सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात आल्याने कामगारांना जगविण्यासाठी २०१९ मध्ये विद्यमान वेंâद्र सरकार व राज्य सरकार ला सत्तेवरुन खाली खचने अत्यावश्यक झाले आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र आयटकचे सरचिटणीस कॉ. श्याम काळे यांनी केले.
२२ जुलै २०१८ ला राणा भवन भंडारा येथे भंडारा जिल्हा आयटक ची सभा आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. हिवराज उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेची प्रस्तावना आयटकचे जिल्हा सचिव व राज्य उपाध्यक्ष कॉ. शिवकुमार गणवीर यांनी केली तर राज्य सचिव कॉ. श्याम काळे यांनी आयटकच्या महाराष्ट्र राज्य कौंसिल सभेच्या निर्णयाची माहिती देवून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, हे सरकार कामगारांच्या हितांचनाही, हे सरकार जाती धर्माच्या नावावर द्वेश पसरवत आहे. म्हणून कामगारांनी ९ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०१८ पर्यंत ४० दिवस लगातार जनजागरण अभियान राबवून किसान, कामगार आणि सर्व सामान्य जनतेशी संवाद साधा असेही कॉ. काळे म्हणाले.
या सभेत २५ ऑगस्टला भंडारा येथे  आयटक चा जिल्हा अधिवेशन घेण्याचे ९ ते ऑगस्ट ते १८ सप्टेंबर पर्यंत जनजागरण अभियान, ८ सप्टेंबर ला स्कीम कामगारांचा जेलभरो आंदोलन इत्यादी निर्णय घेण्यात आले.
सभेला आयटक प्रणित विविध संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ. हिवराज उके, कॉ. दिलीप उटाणे, कॉ. सुनंदा दहिवले, कॉ. आशिशा मेश्राम, कॉ. भाग्यश्री उरकुडे, कॉ. महानंदा नकाते, कॉ. शोभा बावनकर, कॉ. गजानन लाडसे, कॉ. प्रमोद किरणापुरे, कॉ. एच.पी. चावरे, कॉ. व्ही.डी. निपाने, कॉ. गजानन पाचे, कॉ. सविता लुटे, कॉ. मंगला गजभिये, कॉ. मंडपे, कॉ. भड आदींचा समावेश होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours