मुंबई, 25 जुलै : भिवंडीतील खाडीपार इथं एकता चौकजवळ एक तीन मजली इमारत कोसळलीये. या इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत सहा जणांची सुटका केली आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. याशिवाय एनडीआरएफचं एक पथकदेखील घटनास्थळी दाखल झालं आहेत.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ खडसेही या घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारत पडण्यामागे दोषी असल्यांवर कारवाई केली जाईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. या परिसरातील सगळ्या घोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करण्यात आणि दुरूस्ती करण्यात येईल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
खाडीपार येथील एकता चौकजवळ रसुला बाग इथं एक तीन मजली इमारत रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कोसळली. इमारत कोसळल्यानंतर ही इमारतीच्या शेजारी असलेली चाळ ढिगाराखाली दबली गेली. आज दुपारीच या इमारतीच्या भिंतीला तडा जाऊन काही भाग कोसळला होता. त्यामुळे ही इमारत दुपारीच खाली करण्यात आली होती. पण ज्याची भिती होती तेच घडलं. रात्री 8.30 वाजता इमारत शेजारील चाळीवर कोसळली. घटनास्थळी भिवंडी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन केंद्र उपस्थित असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर ठिकाणी ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची मदत पाठवण्यात आली आहे. तसंच एनडीआरएफ ची मदत मागवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाराखालून पाच जणांना सुखरूप बाहेर काढलंय.
एनडीआरएफच्या जवानांकडून मोठं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तर यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours