मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात वनवा पेटला आहे. राज्याची राजधानी मुंबईत बुधवारी मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई रायगडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र यामधून शाळा आणि अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आलंय. पण तरीही सोशल मीडियावर अफवांना पेव फुटला आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं टि्वटमध्ये छेडछाड करून बुधवारी सुट्टी असल्याचं पसरवण्यात येत आहे.

बुधवारी मुंबईत बंद नंतर पुढील महिन्यात 9 ऑगस्ट रोजी ठोक आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलीय. याआधी आज नवी मुंबईत सकल मराठा समाजाची बैठक वाशीतील माथाडी भवनात पार पडली. या बैठकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड येथून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंदची हाक
तर मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदेंनी सोमवारी गोदावरीत उडी मारून जलसमाधी घेतली. आज त्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिसंक वळण मिळालंय. औरंगाबादच्या गंगापूरमध्ये आंदोलकांनी रूग्णावाहिका पेटवून दिली. तर अहमदनगरमध्ये क्रांती चौकात टायरची जाळपोळ करण्यात आली. कोल्हापुरात झालेल्या दगडफेकीत 5 एसटी बसचं मोठं नुकसान झालंय.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील
दरम्यान, मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर ही शहरं बंदमधून वगळ्यात आली होती. मात्र आंदोलक रस्त्यावर उतरल्यानं पुण्यात काही ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे नाशकाच्या येवल्यातही बंद पुकारण्यात आला नसतानाही रास्ता रोको करण्यात आला.  आंदोलकांनी बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्याने अपवाद वगळता बहुतांश शहरातले दैनंदिन व्यवहार हे सुरळीतपणे सुरू आहेत. उस्मानाबादमध्ये मात्र, मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी एसटीवर दगडफेक केल्यानं शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नगरमध्येही आंदोलकांनी रस्त्यावर टायर्स जाळले. नाशिकच्या येवल्यातही रास्तारोको करण्यात आला.
'मुख्यमंत्र्यांना मंदिरात न जावू देऊन काय साध्य केलं'
तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना विठ्ठल मंदिरात न जाऊ देणं यातून काय संदेश जातो याचाही संबंधितांनी विचार करावा अशी टिप्पणी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी केलीये. मराठा आरक्षण आंदोलनावर मंगळवारी राज्यसभा आणि लोकसभेत चर्चा झाली. राज्यसभेत खा.संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण प्रश्नांकडे सर्वांच लक्ष वेधलं.. यानंतर बोलताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी केलेली मार्मिक टिप्पणी सभागृहात चर्चेचा विषय ठरली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन समजलं. पण मुख्यमंत्र्याला विठ्ठल मंदिरात न जाऊ देणं. यातून काय मेसेज जातोय याचाही विचार संबंधितांनी करावा असं नायडू यांनी म्हंटलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours