मुंबई, 25 जुलै : मराठा आंदोलनामुळे काल मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ठप्प होता. पण या आंदोलनाची झळ आज मुंबईला बसणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख शहरांमध्ये आज आंदोलन करण्यात येणार आहे. आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आलीय. सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आयोजीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र आजच्या बंदमधून शाळा आणि अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलंय. दरम्यान येत्या 9 ऑगस्टला आंदोलकांकडून ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला.
सध्या मुंबईच्या माटुंगा, दादर भागातही जनजीवन सुरळीत आहे. दादर प्लाझा भागात नेहमीप्रमाणं वर्दळ आहे. भाज्यांचे टेम्पो, टॅक्सी, बसेस सुरळीतपणे सुरू आहे. किंग्ज सर्कल, दादर प्लाझा भागात पोलिसांची व्हॅनही तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई अद्याप सगळं सुरूळीत आहेत त्यामुळे मुंबईकरांनी काही काळजी करण्याची गरज नाही.
नवी मुंबईतही जनजीवन सुरळीत आहे. आंदोलनाचे कोणतेही पडसाद अद्याप उमटलेले पहायला मिळालेले नाही. वाशी, नेरूळ, सीबीडी बेलापूरमध्ये वाहतूक सुरळीत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणं सुरू आहे.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथमध्येही सध्या बंदचा कोणताही परिणाम नाही. वाहतूकही सुरळीतपणे सुरू आहे. मुंबईत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात केलाय. राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या शहरात विविध भागात असणारेत. तसंच दंगल नियंत्रण पथकालाही तैनात करण्यात आलंय. मोर्चेकऱ्यांच्यात साध्या वेशात स्पेशल ब्रांचचे अधिकारीही असतील. त्याचबरोबर क्राईम ब्रांच आणि प्रोटेक्शन ब्रांचलाही अलर्टवर ठेवण्यात आलंय. याबरोबरीनं स्थानिक पोलिसांचीही मोठ्या प्रमाणात कुमक विविध उपनगरात असेल.
दरम्यान, काल झालेलं आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा राज्य समन्वय समितीच्या सदस्यांनी केलाय. यानंतर राज्य समन्वय समिती पुढील आंदोलची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेईल आणि बैठकीत सर्वानुमते झालेले निर्णयानुसताच आंदोलन पुढे नेले जाईल. कुणीही समन्वय समितीला डावलून निर्णय घेऊन समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही या वेळी रमेश केरे पाटील यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सोमवारी काकासाहेब शिंदेंनी गोदावरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं तर काल आणखी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात देवगाव रंगारीमध्ये आंदोलन सुरू होतं. यावेळी जगन्नाथ सोनावणे नावाच्या तरूणानं नदीच्या कोरड्या पात्रात उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या जगन्नाथ सोनावणेला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours