अमरावती, ता. 16 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु होण्याआधीच पेटले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणारा दुधाचा टँकर फोडला. दूध दरावाढीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांनी नंतर त्या टँकरचे टायरही जाळण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे, गाईच्या दुधाला आणि दूध पावडरला अनुदान द्यावे अशा मागणी, गोकुळने सर्वातआधी केली होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र त्यावर कोणताच निर्णय न झाल्यामुळे गोकुळने एक दिवस संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय या आंदोलनामुळे राज्य सरकारने संघटनेची मागणी मान्य केली तर त्याचा फायदा दूध उत्पादकांना होणार असल्यामुळे नुकसान सहन करुनही गोकुळने एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार 16 जुलै रोजी एक दिवस दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजु शेट्टी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत, जिल्हा दूध उत्पादक संघाने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळ दूध संकलित करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. याच मुद्यावरुन आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणाऱ्या दुधाचा टँकर फोडला. नंतर त्या कार्यकर्त्यांनी ट्रकचे टायरही पेटविण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानीने पुकारलेल्या या आंदोलनामुळे राज्यात दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. गोकुळला एक दिवसाचे सुमारे पाच कोटींचे नुकसान होणार असूनही त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours