मुंबई,ता. 16 जुलै : मुंबईमध्ये आज दूधकोंडी होईल अशी शक्यता आहे. कारण राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिलाय. दुधाला प्रति लिटर 5 रूपये अधिकचा दर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध आंदोलन छेडलंय. पण आज मुंबई आणि उपनगरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती आहे. कारण वारणा दूध महासंघाकडे 3 दिवस मुंबईला पुरेल दूध पुरवठ्याचा साठा असल्याचं सांगितलंय.    
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours