सातारा, 08 जुलै : सातारा स्थानिक गुन्हे अन्वशेष शाखेने केलेल्या कामाचे अनेक वेळा कौतुक झाले आहे मात्र कालपासून या टीमचा एक फोटो सेशन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. साताऱ्यात गांजा विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला एलसीबीने शिताफीने पकडले. पण माध्यमांना फोटो देण्यापूर्वी एलसीबी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याच्या तोंडावर काळा बुरखा घालण्याऐवजी गडबडीत 'पिशवी' घातली.ही पिशवी कापडी आहे की प्लास्टिकची यावरून सध्या चर्चा सुरू आहे.
मात्र या पिशवी घालून काढलेल्या फोटो मुळे सातारा पोलीस वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक व्हाॅट्सअॅप ग्रुपवर पोलिसांनी केलेल्या या किश्याचीच चर्चा रंगू लागली आहे.
अशा प्रकारे फोटो सेशन झाल्याने या प्रकरणाकडे जिल्हा पोलीस प्रमुख कसे पाहतात हेच पाहावे लागेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours