केन्द्र सरकारच्या स्मार्ट सीटी या मोहीमच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा स्मार्ट ग्राम स्पर्धा महाराष्ट्रातील ग्राम पंचायती करिता जाहिर करण्यात आली व तालुक्यातून प्रथम येणाऱ्या ग्राम पंचायतीस 10लक्ष रुपयांचे बक्षीस ठरवण्यात आले होते.   
                            त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राम पंचायती प्रमाणेच आपल्या भंडारा जिल्ह्य़ातील सुद्धा अनेक ग्राम पंचायतींनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. त्या सर्व ग्राम पंचायतीचे जिल्हा स्तरिय चमुकडुन रितसर निरिक्षण करून तालुक्यातून एक ग्राम पंचायत स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात आले होते व नंतर निवडलेल्या ग्राम पंचायती मधुनच जिल्हा स्तरिय पुरस्कारसाठी एक ग्राम पंचायत स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आले होते. व या सर्व विजेत्या ग्राम पंचायतींना 1 मे 2017 ला महाराष्ट्र दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक सावंत व जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक विनीता शाहु यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन विजेत्या ग्राम पंचायतींना गौरवण्यात आले होते.                                       परंतू चौदा महिन्यांचा कालावधी लोटूनही अजुन पर्यंत पुरस्काराचा निधी देण्यात आलेला नाही. सदर पुरस्काचा निधी सबंधित ग्राम पंचायतींना देण्यात यावा अशी मागणी स्मार्ट ग्राम पुरस्कार विजेत्या गावचे उत्तम भागडकर सरपंच गुंजेपार /किन्ही यांनी केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours