रिपोर्टर- हर्षीता ठवकर

भंडारा : पुनर्वसीत वसाहतीलगत असलेल्या शासकीय जागेवर दोन शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाने ४० कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. सतत पाणी साचून राहत असल्याने शहरातील भगतसिंग वॉर्डातील घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांपासून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांपर्यंत निवेदन दिली, उपोषण करण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही.
शहरातील पूरपीडितांचे १९६३ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यांना जागा देवून घरेही बांधण्यात आली. या घराच्या मागच्या बाजूला गावठाणाची शासकीय जागा आहे. परंतु गत काही वर्षांपासून दोन शेतकºयांनी या ठिकाणी अतिक्रमण केले आहे. या संपूर्ण जागेचा ताबा घेऊन लोखंडी गेट बसविले आहे. तसेच या नागरिकांच्या घरामागे शासकीय जागेवर ३० फुट खोल खड्डा केला. परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यास त्रास होत आहे.
खड्ड्यात सतत पाणी साचत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. महत्वाचे म्हणजे या पाण्यामुळे घराच्या भिंती निकामी होण्याची भीती आहे. या भिंती दलदलीमुळे केव्हाही कोसळू शकतात. याबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरपरिषदेला निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नाही. या प्रकाराला कंटाळून १८ जून रोजी काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेत योग्य कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी मुख्याधिकाºयांना निर्देश देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावर मुख्याधिकाºयांनी संबंधित दोन शेतकºयांना नोटीस पाठवून यावबाबत खुलासा मागविला. या सर्व प्रकरणात कारवाई झाली नाही. उलट या भागात दलदल निर्माण झाली. या परिसरातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते देवीदास मारबते म्हणाले, शासन आणि प्रशासन आमच्या समस्येकडे लक्ष देत नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जाते. याप्रकरणी तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रशासन - शेतकºयांचे संगनमत
गत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे. या परिसरात सर्व मोलमजुरी करणारी मंडळी राहतात. शेतकरी त्यांना धमकावतात. प्रशासन याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेत नाही. प्रशासन आणि शेतकºयांचे संगनमत असल्याचा आरोप या भागातील रहिवासी बाबू मेश्राम, शुक्राचार्य डोंगरे, संजय निंबार्ते, रुपचंद मेश्राम, खुशाल आवरकर, बाळकृष्ण बोरकर, विलास ऊके आदींनी केला. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours