मुंबई, 11 जुलै : मुंबईतील मुलुंडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीय. एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर ओळखीच्याच इसमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. मुलुंड पूर्व इथल्या एका निर्माणाधीन इमारतीत सुरक्षारक्षकाचं कुटुंब तात्पुरता निवारा बांधून राहात होतं. याच इमारतीत बांधकाम करणारा कामगार साहेब खान आणि या सुरक्षा रक्षकाची ओळख होती. त्यातूनच साहेब खाननं सुरक्षा रक्षकाच्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला.
या प्रकरणी नवघर पोलिसांनी साहेब खान या आरोपीला अटक केली आहे.
मुलुंड पूर्वमधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचे कुटुंब तात्पुरता निवारा बनवून राहत आहे. गेल्या पाच महिण्यापासून हा सुरक्षा रक्षक इथेच काम करतो. याच इमारतीचे बांधकाम करणारा कामगार साहेब खान याची आणि या सुरक्षा रक्षकाची ओळख होती. शनिवार संध्याकाळी हा आरोपी या सुरक्षा रक्षकाने या साईडवर बनविलेल्या झोपडीत गेला. या वेळी त्याने समोर खेळत असलेल्या मुलीला पाहून तिच्या वडिलाना चहा आणावयास सांगितले. तिचे वडील चहा आणायला बाहेर जाताच या नराधमाने या साडेतीन वर्ष्याच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती असूनही या सुरक्षा रक्षकाचे कुटुंब भीतीने गप्प राहिले. परंतु या कुटुंबातील या पीडित मुलीच्या आत्याने तिच्या घर मालकीनीसोबत स्थानिक समाजसेविका निशा रावल यांना या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
या दोन्ही महिलांनी आणि इतर समाजसेवकांनी या कुटुंबाला धीर देत या पीडित मुलीला मुलुंड मधील सावरकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच याची माहिती नवघर पोलिसांना याची माहिती दिली. नवघर पोलिसांनी तात्काळ आरोपीला मुलुंड मधून बेड्या ठोकल्या आहेत.
प्रचंड भीतीच्या छायेत असलेल्या या कुटुंबाला भीती कोणी घातली होती? तक्रार नोंदविण्यास कोण रोखत होते? या सर्वांचा आता पोलीस तपास करीत आहेत. तर या पीडित मुलीला उपचारासाठी तसेच तपासणीसाठी सायन येथील टिळक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास नवघर पोलीस करीत असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनी सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours