महिन्याभरातच अनेकांना विषबाधा
दोन रूग्ण शासकीय रूग्णालयात
देवानंद पवार यांची रूग्णालयात भेट
यवतमाळ : गतवर्षी किटकनाशक विषबाधेने अनेक शेतकरी शेतमजुरांचे बळी घेतले. मात्र एवढे भयंकर हत्याकांड होऊनही शासन प्रशासनाने त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे यावर्षी हंगामाच्या अगदी सुरूवातीलाच अनेक शेतकरी शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. अनेक रूग्ण उपचार घेऊन घरी परतले असून सध्या २ रूग्ण यवतमाळ येथिल शासकीय रूग्णालयात उपचार घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने याबाबत जिल्हाधिका-यांना लेखी स्वरूपात कळविले आहे.
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी शासकीय रूग्णालयात जाऊन रूग्णांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत पन इंडीयाचे संचालक डॉ. नरसिम्हा रेड्डी, यशवंत इंगोले, लालसिंग अजमेरकर उपस्थित होते. मागीलवर्षी किटकनाशक विषबाधेचे दाहक वास्तव प्रसारमाध्यमांच्या मदतीने शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पुढे आणले होते. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले.
मात्र या समस्येवर शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने हंगामाच्या सुरूवातीलाच विषबाधा होत आहे. पिकांची उंची, दोन झाडांमधील अंतर यामुळे विषबाधा झाल्याचा युक्तीवाद गतवर्षी शासनाकडून करण्यात आला होता. मात्र सध्या कपाशीला पालवी फुटली आहे. या अवस्थेत पानांवर किड दिसू लागल्याने काही शेतक-यांनी फवारणी सुरू केली. त्यामुळे शासनाचा दावा तद्दन खोटा असल्याचा आरोप शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केला आहे.
मागीलवर्षी किटकनाशक विषबाधेसाठी शेतक-यांनाच दोषी धरण्याचा प्रयत्नही विद्यमान सरकारने केला होता. काही किटकनाशक कंपन्यांनी न्यायालयात दावा केला होता की यामध्ये कंपनीची उत्पादनांचा दोष नाही. मात्र आता होत असलेल्या विषबाधेच्या घटनांमुळे वंâपन्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध होत आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणुन सरकारने फवारणी किट शेतक-यांना दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. मात्र गावपातळीवर सरकारने ग्रामपंचायतीमध्ये केवळ ५-६ किट दिल्या आहेत. फवारणी बहुतांश शेतकरी एकाच कालावधीत करतात त्यामुळे त्या किटचा कोणताही उपयोग शेतक-यांना झालेला नाही. किटकनाशक विषबाधा हि समस्या अत्यंत गंभीर झाल्याने यावर विचारविनीमय करून तोडगा काढण्यासाठी लवकरच माजी खासदार नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात नागपुर येथे देशभरातील तज्ञांची परिषद आयोजीत करण्यात येईल अशी माहिती देवानंद पवार यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours