पुणे: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयने नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत बिग बाॅस 12 च्या घरात असलेले लोकप्रिय भजन गायक अनुप जलोटा यांचा समावेश आहे. त्यांच्या समावेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

या कार्यकारणीमध्ये अनुप जलोटा,अभिनेत्री कंगना राणावत ,येसू दास,अरविंद स्वामी, सतीश कौशिक, अर्चना सिंग, ब्रजेश सिंग यांचा महत्त्वाचा व्यक्ती म्हणून समावेश करण्यात आलाय.

तर विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी,डॅनी डेंझोप्पा यांचा माजी विद्यार्थी एफटीआयआय म्हणून समावेश करण्यात आलाय. सुमारे 11 महिन्यांपूर्वी अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

आता या नव्या कार्यकारिणीचा कालावधी 3 वर्षांचा असणार आहे. अनुप जलोटा यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलीये.

दरम्यान, बिग बॉस १२ या रिअलिटी शोमध्ये भजन सम्राट अनूप जलोटा आणि त्यांची प्रेयसी जसलीन मथारू यांच्या नात्याबद्दलच चर्चा रंगलीये. अनूप यांनी बिग बॉसच्या मंचावरच आपल्या प्रेमाची कबुली दिली.

अनूप आणि जसलीन यांनी बिग बॉसमध्ये ‘विचित्र’ जोडी म्हणून प्रवेश केलाय. या दोघांना ‘विचित्र’ जोडी म्हटलं जातंय याच मुख्य कारण म्हणजे दोघांच्या वयात ३७ वर्षांचं अंतर आहे. २८ वर्षांची जसलीन आणि ६५ वर्षांचे अनूप जलोटा गेल्या साडे तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्याची कबुली देताना जसलीन म्हणाली की, 'आतापर्यंत आमच्या नात्याबद्दल कोणालाच माहित नव्हते. पण आता आम्ही जगाला आमच्या नात्याबद्दल सांगायला तयार झालो आहोत.'

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours