नवी दिल्ली: केंद्र सरकारने जेट इंधन, एअर कंडीशनर आणि रेफ्रिजरेटरसह 19 वस्तूंवर आयात कर वाढवला आहे. सरकारने ज्या वस्तूंची विक्री होत नाही त्यांचा निर्यात दर कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलंय की, मागील वर्षी आर्थिक वर्षात या उत्पानदावर एकूण आयात कर हा 86,000 कोटी इतका होता. ज्या वस्तूवर कर वाढवला आहे, त्यात
वॉशिंग मशीन, स्पीकर, रेडियल कार टायर, ज्वेलरी, किचन आणि टेबलवेअर, काही प्लास्टिकच्या वस्तू आणि सुटकेसचा समावेश आहे.
तसंच कम्प्रेसर, स्पीकर आणि बुटांवरही अबकारी करवा क्रमश: 10, 15 आणि 25 टक्क्यांनी वाढवलाय. रेडियल कार टायर वर 10 वरून 15 टक्के कर वाढवलाय. पॉलिश केलेले, सेमी प्रोसेस्ड आणि प्रयोगशाळेत तयार केलेले खडे यावर 5 वर 7.5 टक्के कर वाढवण्यात आलाय.
ज्वेलरी, सोनं, चांदीची भांड्यांवर 15 वरून 20 टक्के कर वाढवण्यात आला. तसंच बाथरूमची उत्पादन पॅकिंग साहित्य, किचनच्या वस्तू, ऑफिस स्टेशनरी, सजावट करणाऱ्या शीट, बांगड्या, ट्रंक, सुटकेस आणि प्रवासी बॅकवर 10 ऐवजी 15 टक्के कर वाढवलाय. तसंच सरकारने विमानाच्या इंधनावरही 5 टक्के कर वाढवलाय. आधी यावर कोणताही कर नव्हता.
Post A Comment:
0 comments so far,add yours