बीड: मराठा समाजाला आरक्षण देण्याची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती कधीच निकाली काढली असती असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. मात्र या वक्तव्याला राजकीय रंग मिळण्याची शक्यता दिसताच पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आपण तसं वक्तव्य केलं. मुखमंत्र्यांना शक्य असतं तर त्यांनीही लगेच सही केली असती असही त्या म्हणाल्या. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवणारं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. त्या पार्श्वभूमीवर पंकजाताईंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी आज परळीत जाऊन या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. पण तुम्ही शांततेनं आंदोलन करा, कायदा हातात घेऊ नका, तुमचा जीव महत्त्वाचा आहे. शिवरायांची शपथ घेऊन सांगते, जर मराठा आरक्षण देण्याची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती कधीच निकाली काढली असती असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्यात.
मी इथं तुमची दूत म्हणून आली आहे, तुमच्यासाठी मी मुख्यमंत्री ते पंतप्रधानांपर्यंत मराठा आरक्षणासाठी जाणार आहे असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. याआधीही पंकजा मुंडे यांनी मराठा तरुणांना आत्महत्या करून नका, तुमचा जीव महत्त्वाचा आहे असं भावनिक आवाहनही पंकजा मुंडेंनी केलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours