भंडारा, दि. 26:-  महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग यांचे वतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमिहीन शेतमजूर व दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक तसेच समाज कल्याण क्षेत्रात अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अंधश्रध्दा निर्मूलन,रुढी निर्मुलन, अन्याय निर्मुलन इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था यांना राज्यात दरवर्षी शासनामार्फत विविध पूरस्कार देवून गौरविण्यात येते. 
 सन 2017-18 या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार विनोद दयाराम मेश्राम यांना तर पद्यश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार मिरा भट यांची निवड करण्यात आली असून त्यांना 3 जुलै 2018 रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते पुरस्कार, स्मृतिचिनह, शाल, श्रीफळ देवून  गौरविण्यात आले आहे. 
 मिरा भट व विनोद मेश्राम यांच्या जनहिताचा, सामाजिक हिताच्या कार्याचा जिल्हयातील जनतेने बोध घ्यावा, असे आवाहन सहाय्यकआयुक्त  समाज कल्याण आशा कवाडे यांनी केले आहेShare To:

Post A Comment:

0 comments so far,add yours