नागपूर : येत्या 48 तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं दिलाय. आधीच जमीन खरडून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. अतिवृष्टीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने तयारी केलीये.
अतिवृष्टीमुळे विदर्भातील 40 हजार हेक्टर्समधील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी खात्याने व्यक्त केलाय. तर यामुळे विदर्भात हजार कोटींचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली आणि अकोला या जिल्ह्यामधील अतिवृष्टीमुळे शेतातील कापूस, सोयबीन आणि तूर वाया गेल्याची परिस्थीती आहे. पुरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांना भरपाई साठी केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही.
महिनाभऱ्याच्या विश्रांतीनंतर विदर्भात पाऊस आला. कापूस, सोयाबीन आणि तुरीसाठी हा पाऊस उपयुक्त होता, पण अतिवृष्टीमुळे याच पावसाने पिके उद्धवस्त केली. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 40 हजार हेक्टर्स मधील पिके या मुसळधार पावसामुळे उद्धस्त झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा आणि आर्णी मध्ये बाजारपेठेत पाणी शिरल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. तर हजारो घरे कोसळली आहे.
शासनाने पुरग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत, पण भरीव नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफ कडे अद्याप प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही.
Post A Comment:
0 comments so far,add yours