जळगाव : सांगली आणि जळगाव महापालीकेसाठीचं मतदान बुधवारी सायंकाळी संपलं. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं. मतदान अंदाजे 55 टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता असून निवडणूक आयोगाने अद्याप मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5,30 पर्यंत मतदान चालललं दोनही ठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. साडेपाचपर्यंत रांगेत असलेल्या सर्व नागरिकांना मतदाना करू देण्यात आलं. दोनही ठिकाणांची मतमोजनी 3 ऑगस्टला होणार आहे. सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सांगली
सांगलीत मतदान शांततेत पार पडलं. 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हे गाव असल्याने पाटील गेल्या दोन महिन्यांपासून सांगलीत तळ ठोकून आहेत. त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर भाजपच्या वतीनं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आघाडी सांभाळली. तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत असून खासदार गजानन किर्तिकर यांनी शिवसेनेचा गढ सांभाळला. राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलेलं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सांगलीत प्रचाराला जाता आलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड खेचून आणण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे. तर वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसलीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours