नागपूर- मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गोवारी हे आदिवासीच असल्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे. गेल्या 23 वर्षांपासून सुरू असलेला या लढ्याला अखेर आज न्याय मिळाला आहे. खंडपीठाच्या या निर्णयामुळे गोवारी समाज मोठा आनंद साजरा करताना दिसत आहे.
गोवारी हा आदिवासी समाज मुख्यत्वेकरून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भात आढळून येतो. या समाजातील लोकांचं मुख्य काम गायी राखणे आहे. यांना गुराखी देखील म्हटलं जातं. गोवारी समाजाच्या वतीने आयोगाकडे बाजु श्रीहरी अणे यांनी लढवली होती. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गोवारींना एसटीचा दर्जा देण्यात आला आहे.
गोवारी समाजाला आता आदिवासी समाजाचा दर्जा प्राप्त झाल्याने गोवारी समाजाला शिक्षण, नोकऱ्या आणि राखीव विधानसभेच्या जागेत एसटीचा फायदा मिळणार आहे. दरम्यान, गोंड आणि गोवारी हे दोन समाज आहेत असंही हायकोर्टाने म्हटलं आहे.
काय आहे गोवारी घटना ?
२३ नोव्हेंबर १९९४ विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात गोवारी समाजाचा मोर्चा
मोर्चानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ जणांचे बळी
या घटनेत 500जण जखमी
गोवारी समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  काढण्यात आला होता मोर्चा
या घटनेनंतर अनेक ठिकाणी गोवारी बांधवांचे मोर्चे
दरवर्षी 23 नोव्हेंबरला गोवारी स्मृती दिनाचं आयोजन
विदर्भ पट्ट्यात आणि मराठवाड्यात गोवारी समाज मोठ्या प्रमाणावर
या घटनेनंतर तत्कालीन आदिवासी मंत्री  मधुकर पिचड यांनी दिला होता राजीनामा
तत्कालीन राज्य सरकारनं या घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती एस एस दानी यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती
ही घटना दुर्देवी असल्याचं मत आयोगानं व्यक्त केलं होतं
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours