शिर्डी : आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुस्लीम समाजही आक्रमक झाला आहे. नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करणार असल्याचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मुस्लीम समाजाच्या आंदोलकांवर मंगळवारी नेवासे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना अटक केलीय.
मराठा आणि धनगर समाजानंतर आता मुस्लिम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शिक्षण आणि नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे अशी मुस्लीम समाजाची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करा, अन्यथा 16 ऑगस्ट रोजी नगर-औरंगाबाद महार्गावरील कायगाव टोका येथे गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करू, अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मुस्लीम समाजाच्या आंदोलकांवर नेवासे पोलिसांनी मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना अटक केली.
यावेळी आंदोलकांनी "एकच मिशन.. मुस्लीम आरक्षण" आशा घोषणा दिल्या. अटक केलेल्या आंदोलकांना नेवासे न्यायालयात हजर करण्यात आले असता, आंदोलकांनी जामीन नाकारला. 7 आंदोलकांना 17 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलना दरम्यान कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरीत उडी मारल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेवासे पोलिसांनी आंदोलांकवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेतलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours