ठाणे  :  गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अमोल काळेच्या मुसक्या आवळल्या तर नालासोपारा स्फोटकं प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने शरद कळसकरला बेड्या ठोकल्या. पण यांच्या तपासातून सचिन अंदुरेचे नाव समोर आले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. डाॅक्टर नरेंद्र दाभोळकरवर सचिन अंदुरेनं गोळ्या झाडल्या हे ही तपासात समोर आलं. पण ज्या विरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली त्या विरेंद्र तावडतेच्या टार्गेटवर ३ आणखी जण होते. कोण होते ते तिघं? असं काय केलं होतं त्यांनी?
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या विरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून करण्यात आलीये हे सीबीआयनं सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडी अर्जात स्पष्ट केलं होतं. याच विरेंद्र तावडेला सीबीआयने ११ जून २०१६ ला अटक केली होती. विरेंद्र तावडेच्या टार्गेटवर आणखी दोन लोकं होती. जर विरेंद्र तावडेला अटक झाली नसती तर आणखी २ जणांची हत्या करण्यात झाली असती असा धक्कादायक खुलासा विरेंद्र तावडेच्या चौकशीतून झालाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours