बेळगाव, २२ ऑगस्ट- चिखलेगावाशेजारीच भरत कुरणे यांने एक रिसॉर्ट बांधलं होतं. याच रिसॉर्टमधून सगळ्या हत्यांचा कट शिजला. आतापर्यंत पकडलेल्या सगळ्या संशयितांनी  चिखले गावामध्ये हजेरी लावली आहे.  सूत्रांनी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार विवेकवाद्यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी तीन जण होते. 
यातलं पहिलं नाव आहे मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे, दुसरं नाव आहे तत्कालीन पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ आणि तिसंर नाव आहे विजय सोनावणे. पानसरेंच्या हत्येप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेच्या कॉम्प्युटरमध्ये धर्मद्रोही नावानं एक फोल्डर सेव्ह करण्यात आला होता.  त्या फोल्डरमध्ये तीघांचे फोटो सेव्ह करण्यात आले होते.  एकीकडे गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेच्या चौकशी दरम्यान मिशन अँटी हिंदूचा पर्दाफाश झालाय. अशातच मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या आणखीन तीन जणांची नावं समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours