उस्मानाबाद, 3 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी तरुणीने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावात घडली. तृष्णा तानाजी माने (वय १९) असे या तरुणीचे नाव आहे. ती बी-कॉमच्या द्वितीय वर्षाला होती. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनांमध्ये तृष्णा सहभागी असायची. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ती कमालीची अस्वस्थ्य होती. याच कारणातून तिने बुधवारी तीच्या राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या केली. घडला प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी तिला रुग्णालात दाखल केले. मात्र, सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तृष्णाच्या अशा जाण्यामुळे जिल्ह्यात संतापची लाट उसळली. मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत तृष्णावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. यानंतर गावात व जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर आज दुपारी 2.30 वाजता तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours